International Student Cell for the academic year 2023-2024 is constituted as under:
S. N. | Name | Department | Designation |
1. | Dr. Sudhir Bhamre | Dean | Chairman |
2. | Dr. Singh Jeetendra | Professor & HOD, Dept of Pharmacology | Student Affair Coordinator |
3. | Dr. Preeti Bajaj | Professor & HOD, Dept of Pathology | UG Academic Coordinator |
4. | Dr. Ashok Vankudre | Professor, Community medicine | Research Coordinator |
5. | Dr. Anand Bhide | Associate Professor, Community Medicine | Member Secretary |
6. | Mr. Pekhale Tanaji | Head Clerk, P.G Section | Member |
7. | Mr. Mali Narayan | Head Clerk, U.G Section | Member |
8. | Dr. Sneha Kumar | Student Representative (PG) | Member |
9. | Ms. Svasti Sharma | Girl Student Representative (UG) | Member |
10. | Mr. Sanyam Mutta | Boy Student Representative UG | Member |
मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात परदेशातील १५ विद्यार्थी अभ्यासात आहे उपचार पद्धती
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, आडगाव, नाशिक येथे बाहेरील देशातून १५ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणातील उपचार पद्धतीचा अभ्यास करीत असल्याची माहिती मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी दिली आहे.
डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या इंटरनॅशनल स्टुडेंट सेल आणि मेडिकल स्टूडेंट असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्तविद्यमाने वैद्यकीय उपचार पद्धती अभ्यासासाठी भारतातून विविध देशात विद्यार्थी जातात आणि परदेशातील विद्यार्थी भारतात येत असतात. त्यानुसार डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालतूनही २०१९ पासून आतापर्यंत १५ विद्यार्थी विविध देशात उपचार पद्धती अभ्यासत आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातही यांअतर्गत टेओडोर टूरु (रोमानिया) , रालउका सायंदु, (रोमानिया), लुकास पियरे (फ्रान्स), ऍड्रिअनो बर्रेटो (ब्राझील) सारह गोवील, यौसीड गोवील (इजिप्त), अहमद अला (इजिप्त), अमन्य अस्कार, मोहम्मदईलबोराइ मोहम्मद (सुदान), या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेलचे डॉ. जितेंद्र सिंग, डॉ. राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी उपचार पद्धती अभ्यासत असल्याचे महाविद्यालयाने सांगितले. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी समन्वयक आकाश दुबे आणि खुशाल गिरीगोसावी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. परदेशातील पंधरा विद्यार्थ्यांनी वैद्यकीय उपचार पद्धती अभ्यासनासाठी डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाची निवड केली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाची गुणवत्ता व दर्जेदार उपचार पद्धती आणि मविप्र रुग्णालयाचा नावलौकिक वाढला असल्याचे यावरून अधोरेखित झाले आहे