Spectrum of Surgical Services

डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयायाच्या रुग्णालयात किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी:

            डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अद्ययावत असे सुसज्ज सीव्हीटीएस शस्त्रक्रिया गृह असून सीव्हीटीएस चे थोरॅसिक सर्जन डॉ. प्रणव माळी आणि सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ३२ वर्षांच्या एका रुग्णाची ब्रॉन्काइक्टेसिसमुळे नष्ट झालेल्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसावर न्यूमोनेक्टॉमी शस्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

     दुसरी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया कान ,नाक,घसा तज्ञ् डॉ. शशिकांत पोळ यांनी केली असून म्यूको-एपिडर्मॉइड कार्सिनोमा जो हृदयातून शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीला चिकटलेला होता. डॉ. शशिकांत पोळ यांनी व त्यांच्या सहकारी मिळून कॅन्सरची गाठ निपुणतेने काढून त्या जागी डेल्टो-पेक्टोरल फ्लॅप शस्त्रक्रिया केली. भूलशास्र विभागातील तज्ज्ञांनी यात कौशल्यपणाला लावत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात योगदान दिले.

     तिसरी शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची व किचकट होती. न्यूरोसर्जन डॉ. श्रीकांत पालेकर आणि त्यांच्या टीमने मेंदूच्या उजव्या बाजूला जागा व्यापणाऱ्या गाठेसाठी अवेक क्रॅनियोटॉमी ही शस्रक्रिया केली. शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतील भागात अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉ- श्रीकांत पालेकर यांनी यशस्वीरीत्या केली.

चौथी शस्रक्रिया नेत्ररोग विभागाच्या नेत्ररोग तज्ञ् डॉ. कल्पना गडसिंग यांनी केली असून रुग्णाच्या रेटिना (दृष्टी पटल) डिटेचमेंट पूर्ववत करण्यासह मोतीबिंदूची गुंतागुंतीची, संवेदनशील व नाजूक अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात इरिडोडायलिसिस दुरुस्ती, लेन्सेक्टमी आणि विट्रेक्टमी या सर्जरी करण्यात आल्या.

या सर्व शस्रक्रिया दरम्यान रुग्णालयातील भूलशास्र विभागाच्या प्राद्यापक व विभागप्रमुख डॉ. सुनीता संकलेचा, डॉ. काशिनाथ जाधव, डॉ. नेहा कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रूग्णांचे उत्तम व्यवस्थापन केले आहे. सर्व रुग्णांची स्थिती शस्त्रक्रियेनंतर स्थिर आहे. परिचारिका टिमनेही शस्त्रक्रियापूर्व संपूर्ण तयारी करुन शस्त्रक्रियेनंतरही रुग्णांची काळजी तज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. याकरिता मविप्र पदाधिकारी व संचालक मंडळाने मविप्र रुग्णालयाचे अभिनंदन केले आहे.

       मविप्र रुग्णालयात निष्णांत आणि तज्ञ् डॉक्टरांकडून रुग्णांवर अतिशय माफक दरात तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत निवड करून रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. मविप्र रुग्णालयात 24 तास विविध आजरांवरील तज्ञ डॉक्टर्स, हृदयरोग, मेंदूरोग तज्ञ ई. कार्यरत आहेत. सुसज्ज व अदययावत अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक कॅथलॅब, कार्डियाक ऑपरेशन थिएटर तसेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर, व्हाॅल्व रिपेअर, रिप्लेसमेंट, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया अश्या ह्रदय रोगावरील विविध शस्त्रक्रिया मविप्र रुग्णालयात शासनाच्या विविध योजनांतुन केल्या जातात त्याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी. दरेकर, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी केले आहे.