नाशिक, आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि मविप्र रुग्णालय आणि संशोधन केंद्रात कर्करोग निदान आणि उपचार कक्ष कार्यान्वित झाला असून त्यामुळे नाशिक शहर , जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे , जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आणि अधिष्ठाता डॉ सुधीर भामरे यांनी दिली-
मविप्र रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात कर्करोग निदान व उपचार कक्ष कार्यान्वित झाला असून त्याचे उद्घाटन ॲड. नितीन ठाकरे व पदाधिकारी आणि संचालक यांच्या उपस्थितीत झाले-
या कर्करोग निदान व उपचार कक्षात कॅन्सर सर्जन डॉ- सुलभ भामरे आणि कॅन्सर फिजिशियन डॉ- शैलेश बोंदार्डे हे रुग्णांना सेवा देणार आहेत. मविप्र रुग्णालयात नवीन डिजिटल एक्स-रे, डीआर सिस्टम आणि डिजिटल एक्स-रे स्कॅनोग्राम या अद्ययावत मशीन उपकरणाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले-
नवीन ऑन्कोलॉजी युनिट आणि नवीन रेडिओलॉजी उपकरणे हे सर्वसामान्य रुग्ण आणि मविप्र सभासदांसाठी वरदान ठरतील. तसेच नवीन कर्करोग निदान व उपचार कक्ष जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा देणारे असून अद्ययावत उपचार प्रदान करण्यासाठी मविप्र व्यवस्थापनाने उचलेले हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले-
यावेळी शिक्षणाधिकारी डॉ- ज्ञानेश्वर लोखंडे , अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे , उप वैद्यकीय अधीक्षक डॉ- कल्पना देवणे , सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ- कैलास मोगल, रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ- निलेश चौधरी , ऑन्को सर्जन डॉ सुलभ भामरे, ऑन्को फिजिशियन डॉ शैलेश बोंदार्डे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.